Thursday, October 1, 2026
Homeजळगावजिनियस राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार सोहळा

जिनियस राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार सोहळा

जिनियस राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार सोहळा

जामनेर   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

जिनियस मास्टर्स फाउंडेशन, जामनेर यांच्या वतीने आयोजित ‘जिनियस राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये उपस्थित राहिलो.
शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा आणि समाजाच्या भविष्याची पायाभरणी करणारा मार्गदर्शक असतो. आपल्या कार्यातून अनेक पिढ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होणे ही निश्चितच अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
यावेळी पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कार्याची प्रेरणा अनेकांना मिळो आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान असेच पुढे वाढत राहो, ही सदिच्छा. यावेळी नगराध्यक्षा साधनाताई महाजन, आमदार नंदूभाऊ महाजन भाजपा जळगाव पूर्व उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, अमर पाटील यांच्यासह पुरस्कारप्राप्त शिक्षक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या