Thursday, October 1, 2026
Homeजळगावएमआयएल दिनानिमित्त वरणगाव आयुध निर्माणीत शस्त्रास्त्र व दारूगोळा प्रदर्शन

एमआयएल दिनानिमित्त वरणगाव आयुध निर्माणीत शस्त्रास्त्र व दारूगोळा प्रदर्शन

एमआयएल दिनानिमित्त वरणगाव आयुध निर्माणीत शस्त्रास्त्र व दारूगोळा प्रदर्शन

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     आयुध निर्माणी वरणगाव येथे एमआयएल दिनानिमित्त (दि. १ ऑक्टोबर) कम्युनिटी हॉलमध्ये शस्त्रास्त्रे व दारूगोळ्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक एम. झेड. सरवर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाप्रबंधक आर. के. श्रीवास्तव, अपर महाप्रबंधक एस. के. नव्हाले, अमर सिंह राठौर, उपमहाप्रबंधक भुवनेश वर्मा, आशीष व्ही. कुंभारें, वरिष्ठ प्रबंधक अक्षय कुमार एस. वासू व संभाजी एस. पवळे यांच्यासह आयुध निर्माणीतील अधिकारी उपस्थित होते.
या प्रदर्शनाला जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दलबलासह भेट दिली. त्यांनी प्रदर्शनाची पाहणी करून आयुध निर्मिती व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्याची माहिती घेतली. प्रदर्शनाबाबत त्यांनी गौरवोद्गार काढले.
प्रदर्शनाला श्री संत गाडगे बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर येथील विद्यार्थी तसेच परिसरातील विविध गावांमधील नागरिक आणि भुसावळ शहरातील नागरिकांनी भेट देत प्रदर्शनाची पाहणी केली. शस्त्रास्त्रे व दारूगोळ्याची माहिती प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने नागरिकांनी प्रदर्शनाचे कौतुक केले.
या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी वरिष्ठ प्रबंधक व्ही. के. कोल्हे, गणेश तिवारी, धनेश्वर चौधरी, शेखर चौधरी आणि अमोल पाटील यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या