आज जळगाव येथे महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दिनांक ४
सोमवार दि.५ रोजी जळगाव येथे महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुख उपजिल्हा प्रमुख,तालुकाप्रमुख,शहर प्रमुख यांना कळविण्यात येते की,दि.६ आक्टोबर रोज मंगळवारी दुपारी १२ वा.शिवतीर्थ मैदानापासून , जळगाव महाविकास आघाडी तर्फे भव्य मोर्चा आयोजित केला आहे,
जिल्ह्यातील दुष्काळ,शेतकरी एकरी ५०,००० हजार रुपये सरसकट मदत,शेतकरी कर्ज मुक्ती योजना ,एक रु विमा सुरु करणे,घोटाळेबाज ज्ञानेश कुमार राजीनामा,एसआयआर जाचक अटी रद्द,जलजीवन योजना भ्रष्टाचार या विषयावर महविकास आघाडी तर्फे भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे,तरी सर्व कार्यकर्त्यांनी जळगाव येथे शिवतीर्थ मैदानावर उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या जिल्हाप्रमुख / जिल्हाध्यक्षांनी केले आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार गुलाबराव वाघ,शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख – रावेर लोकसभा मतदारसंघ यांनी नमूद केले आहे.

