Thursday, October 15, 2026
Homeजळगावजे.टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती साजरी.

जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती साजरी.

जे.टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती साजरी.

यावल       खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी   दि.१५
यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये १५ ऑक्टोंबर रोजी डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांना ए.पी. जे अब्दुल कलाम हे एक फार मोठे शास्त्रज्ञ होते व त्यांना वाचनाची आवड होती हे मुलांना कळावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला .
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन मॅडम उपस्थित होत्या यावेळी इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या दिपाली धांडे मॅडम,पर्यवेक्षिका गौरी भीरुड व राजश्री लोखंडे कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस फुल अर्पण करण्यात आले त्यानंतर प्रीती भार्गव यांनी मुलांना माहिती सांगितली तसेच सरोज येवले यांनी सुद्धा मुलांना माहिती दिली .
प्रेरणा वाचन दिनानिमित्त मुलांचे वाचन घेण्यात आले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम कोळंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना पाटील यांनी केले .
अशा प्रकारे हा कार्यक्रम शाळेत मोठा उत्साहाने पार पाडण्यात पार पडला .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या