आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनतर्फे.
‘ड्रग फ्री डिस्ट्रिक्ट अभियान २०२६’चे आयोजन
लोणारी समाज मंगल कार्यालय, भुसावळ येथे जनजागृती व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
भुसावळ, खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि. ८ ऑक्टोबर २०२६ :
आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनतर्फे ‘ड्रग फ्री डिस्ट्रिक्ट अभियान २०२६’ अंतर्गत भुसावळ येथील लोणारी समाज मंगल कार्यालयात जनजागृती व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. फाउंडेशनच्या संचालिका डॉ. वंदना उमेंद्र वाघचौरे व अध्यक्ष श्री. उमेंद्र वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
या अभियानाचा मुख्य उद्देश विद्यार्थी व युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे तसेच व्यसनमुक्त युवक, व्यसनमुक्त कुटुंब आणि व्यसनमुक्त समाज हा संदेश पोहोचवणे हा होता. कार्यक्रमाच्या आयोजनात आर्या फाउंडेशन संचलित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व कौशल्य विकास महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व यूथ टीमने सक्रिय सहभाग घेतला.
चित्रकला व रील स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
अभियानांतर्गत इयत्ता १०वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ड्रग फ्री डिस्ट्रिक्ट’ या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध शाळांच्या मुख्याध्यापक व प्रतिनिधींनाही सन्मानपत्र देण्यात आले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आयोजित रील स्पर्धेत युवकांनी व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश दिला. स्पर्धेत प्रथम क्रमांक शुभम नालेकर, द्वितीय क्रमांक अमन शेख व तृतीय क्रमांक शेहझान शेख यांनी मिळविला. सर्वाधिक ऊर्जावान व प्रभावी रीलसाठी सरफराज शेख याला विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व रील स्पर्धकांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पथनाट्याद्वारे व्यसनमुक्तीचा संदेश
कार्यक्रमात स्वराज्य पथनाट्य संस्था तसेच पर्यावरण जागर संघटना व ब्रह्मकुमारी संस्थेच्या संपूर्ण टीमने व्यसनमुक्ती विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले. या माध्यमातून नशेपासून दूर राहण्याचा व निरोगी जीवनाचा संदेश उपस्थितांना देण्यात आला.
मान्यवरांची विशेष उपस्थिती
कार्यक्रमास भुसावळचे डीवायएसपी श्री. केदार बारबोले, प्रोबेशनरी डीवायएसपी श्री. प्रशांत दरेकर तसेच भुसावळ सिटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. महेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच प्रतिष्ठा महिला संस्थेच्या संस्थापिका श्रीमती रजनीताई सावकारे, भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष श्रीमती शैलजाताई नारखेडे, श्रीमती वर्षाताई तल्लारे, श्रीमती शमीभाताई पाटील तसेच तंबाखूमुक्त परिसराचे ब्रँड अॅम्बेसेडर श्री. राज मोहम्मद यांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी ट्रॉमा केअर सेंटरचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. आसिफ शेख, गोल्डन आर हॉस्पिटलचे संचालक डॉ. शंतनू साहू, श्री. विकास मकदूम, श्री. सचिन माने, डॉ. रजनी बडगुजर, अरुणोदय फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. अरुण तायडे तसेच श्रीमती लता तायडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
33 सामाजिक संस्था व माध्यम प्रतिनिधींचा सन्मान
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 33 सामाजिक संस्था व संघटनांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या विविध न्यूज चॅनेल्सचे संपादक, संचालक व मीडिया प्रतिनिधींचाही विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी आर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ. वंदना उमेंद्र वाघचौरे यांचा पोलीस सहकार्य समिती तसेच श्रीमती वर्षाताई तल्लारे यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या सन्मानाबद्दल
डॉ. वंदना वाघचौरे यांनी पोलीस सहकार्य समिती, श्रीमती वर्षाताई तल्लारे व त्यांच्या संपूर्ण टीमचे आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात टीमचे योगदान
कार्यक्रमाच्या संपूर्ण नियोजनात आर्या फाउंडेशनच्या अॅडमिनिस्ट्रेटिव्ह हेड श्रीमती अंजुम खान यांनी विद्यार्थ्यांच्या व यूथ टीमच्या सहकार्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन समाजसेवक व व्याख्याता
श्री. कमलेश सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्ययन कौशल्य विकास महाविद्यालयाच्या लेक्चरर श्रीमती मनीषा सुनील बाविस्कर यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, सामाजिक संस्था, शाळा, विद्यार्थी, मीडिया प्रतिनिधी, पथनाट्य टीम तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
‘ड्रग फ्री डिस्ट्रिक्ट अभियान २०२६’च्या माध्यमातून आर्या बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनने युवक व समाजामध्ये व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश देत सामाजिक जनजागृतीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.

