खोखो स्पर्धेत स्वामीनारायण गुरुकुल चा संघ जिल्ह्यासाठी पात्र


भुसावळ (वा )17 वर्षेवयोगटाखालील भुसावळ तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत साकेगाव येथील श्री स्वामिनारायण गुरुकुलचा संघ विजयी होऊन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
नुकत्याच तालुकास्तरावर झालेल्या क्रीडास्पर्धांमध्ये खो-खो स्पर्धेत विजयी होऊन साकेगाव येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल विद्यालयाच्या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. संघाला क्रीडाशिक्षक दीपक बावस्कर यांचे तसेच मुख्याध्यापक प्रणिता चौधरी, उज्वला धांडे आणि मनोज भोसले यांचे मार्गदर्शन मिळाले. विजयी संघाचे तसेच क्रीडाशिक्षक बावस्कर यांचे संस्थेचे प्रमुख प.पू.ऋषिप्रसाद स्वामी, गोपाळ भगत आणि संस्थेच्या पदाधिकारी यांनी सत्कार व कौतुक केले.

