रावेर विधानसभा मतदारसंघात डॉ.नरेंद्र महाले यांचे नि:पक्ष मतदान व मतदार जनजागृती अभियान ठरत आहे कौतुकास्पद !
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रावेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणातील सर्व उमेदवार आप- आपल्या पक्ष ध्येय, उद्दिष्ट,धोरणानुसार तसेच अपक्ष उमेदवार आपल्या नियोजनानुसार प्रचार करीत असले तरी शासनातर्फे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी तसेच मतदार जनजागृती करण्यासाठी शासनाने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले या सर्व उपक्रमात यावल येथील सरस्वती विद्या मंदिरातील डॉ.नरेंद्र महाले यांचे नि:पक्षपणे मतदार जन जागृती अभियान लक्षवेधी व कौतुकास्पद ठरल्याने नक्कीच मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणार असल्याचे शासकीय यंत्रणेत बोलले जात आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अकलाडे साहेब, तसेच जिल्हा सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील व माध्यमिक कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण जिल्हाभरामध्ये मतदान जनजागृती पर कार्यक्रम सुरू आहे.महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक २० नोव्हेंबर २०२४ ला असल्याने यावल,रावेर तालुक्यामध्ये प्रबोधनाचे कार्य शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत जोमाने होत आहे.यामध्ये प्रत्येक मतदारांमध्ये मतदानाची जागृती करत असताना ठीक ठिकाणी मतदानाच्या संदर्भात प्रबोधन केले जात आहे .यामध्ये मतदान करणारा प्रत्येक मतदार व त्याच्या कर्तव्या विषयी त्याला जाणीव करून दिली जात आहे.मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष गाण्यांच्या माध्यमातून,नाटिकांच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य सुरू आहे.यासाठी आज यावल येथील सरस्वती विद्यामंदिरच्या वतीने विशेष लक्षवेधी पद्धतीने भारुडाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.




