Friday, May 1, 2026
Homeजळगावघरात कुणीही नसताना १७ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या!

घरात कुणीही नसताना १७ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या!

घरात कुणीही नसताना १७ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील वरणगाव येथून जवळच असलेल्या फुलगाव येथील पुष्पालता नगरमधील एका १७ वर्षीय तरुणीने छताला साडी बांधून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेनंतर मुलीच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केल्याने उपस्थितांचे डोळेही पाणावले होते. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील धानोरा येथील मूळ रहिवासी व फुलगाव येथील पुष्पलता नगरमधील रहिवाशी विलास राजाराम दांडगे यांची कन्या संजीवनी दांडगे (वय १७) हिने शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेपूर्वी पंख्याच्या छताला साडी बांधून आत्महत्या केल्याची घटना घडली. या तरुणीने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. संजीवनी दांडगे ही वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ती अकरावीचे शिक्षण घेत होती.फुलगाव येथील पुष्पलता नगरमध्ये मुलीचे आजोबा मधुकर महिपत निकम यांचे राहते घर आहे. त्याच घरातील वरच्या मजाल्यावर कुणीही नसतांना संजीवणी हिने पंख्याच्या छताला साडी बांधून गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली.

दरम्यान, यानंतर संजीवणीला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश उगले यांनी तिला मृत घोषीत केले. याप्रकरणी विलास दांडगे यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास स.पो.नि. जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रामदास गांगुर्डे, गणेश राठोड, ईश्वर तायडे करत आहेत. दरम्यान, मृत संजीवनीचे वडिल मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या