Friday, May 1, 2026
Homeगुन्हामालकाला बोलाव, म्हणत सुपर वायझरला मारहाण !

मालकाला बोलाव, म्हणत सुपर वायझरला मारहाण !

..मालकाला बोलाव, म्हणत सुपर वायझरला मारहाण !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – परिसरात राखेच्या बंडाबाबत तक्रारी वाढत असून मारहाणीपर्यंत पोचल्या आहेत. शहरातील सुपर वायझरला मारहाण करण्यात आली. ही घटना २४ रोजी रात्री १० वाजता घडली. याबाबत गुरुवारी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शब्बीर तडवी रा. भुसावळ हा विकी चाहेल व बाळू इंगळे यांच्या राखेच बंडावर काम करतो. २४ रोजी रात्री ड्युटीवर असताना करण बेलदार व नितीन बेलदार रा. विल्हाळे यांनी तुझ्या मालकाला बोलाव, अशी धमकी देत मानेवर लोखंडी रॉड मारला. शिविगाळ व मारहाण करीत जबर जखमी केले. शब्बीर तडवी यांच्यावर जळगावला उपचार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली जात नव्हती. चार-चार तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर वरणगाव पोलीस स्टेशनला त्यांची तक्रार घेण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या