Friday, May 30, 2025
Homeगुन्हाराज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने यावल शहरात विना परवाना ताडी विक्रीच्या दुकानात...

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने यावल शहरात विना परवाना ताडी विक्रीच्या दुकानात टाकला छापा.

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने यावल शहरात
विना परवाना ताडी विक्रीच्या दुकानात टाकला छापा.

 

यावल दि.२९   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल शहरात बोरावल गेट परिसरात मेन रोडवर म्हसोबा देवस्थान पासून १०० ते १५० मीटर अंतरावर विनापरवाना ताडी विक्री व पन्नीची दारू विक्री करणाऱ्या दुकानात तथा दुकानाच्या दर्शनी भागावर दुकानाच्या नावाचा फलक नसलेल्या दुकानात आज गुरुवार दि.२९ रोजी सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने अचानक छापा टाकून विनापरवाना ताडी विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने संपूर्ण यावल शहरात मोठी खळबळ उडाली.

 


याबाबत अधिकृतरित्या मिळालेली सविस्तर माहिती अशी की
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक महाराष्ट्र राज्य, मुंबई या पथकाने दि. २९/०५/२०२५ रोजी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार बोरावल गेट यावल, तालुका यावल, जि.जळगाव येथे विना परवाना ताडी विक्री केंद्रावर छापा घातला असता २५० ली.ताडी साठा ( किंमत ८८७०/ ) मिळून आला महाराष्ट्र दारुबंदी गुन्हया अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

सदर गुन्हयाचे तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक नवनाथ घोडके हे करीत असून सदर कारवाईत सहाय्यक दुय्यम निरीक्षक रवींद्र पाटील,जवान सर्वश्री सोमनाथ पाटील शाहरुख तडवी यांनी भाग घेतला. या कारवाईमुळे यावल शहरात समाजात समाधानकारक कौतुकास्पद बोलले जात आहे.

 

यावल परिसरात काही बियर बार चालक हे अधिकृत रित्या ट्रेडमार्फत बियर खरेदी न करता चिनावल,सावदा,फैजपूर,भुसावळ ( यावल येथील वाईन शॉप नव्हे ) इत्यादी ठिकाणच्या वाईन शॉप मधून अवैधरीत्या बिअर आणून सर्रासपणे विक्री करीत आहे,यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल दर महिन्याला बुडविला जात आहे काही ठिकाणी बनावट दारू व पत्नीची दारू सुद्धा विक्री आहे अशा ठिकाणी सुद्धा दारू उत्पादन शुल्क विभागातील भरारी पथकाने छापा टाकून कारवाई करायला पाहिजे अशी मागणी बिअर पिणाऱ्यांमधूनच तसेच पनीर पिणाऱ्यांचे आरोग्य खराब होत असून काही पण पिणारे मृत्युमुखी पडत आहेत त्यांचे नातेवाईकांकडून सुद्धा ठोस कारवाईची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या