Saturday, May 31, 2025
Homeगुन्हाउभ्या असलेल्या ट्रकला धडक ; चालकाचा जागीच मृत्यू

उभ्या असलेल्या ट्रकला धडक ; चालकाचा जागीच मृत्यू

उभ्या असलेल्या ट्रकला धडक ; चालकाचा जागीच मृत्यू !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ महामार्गावर गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास मालवाहू वाहनाने रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रकला (क्रमांक आर. जे. १९, जी.एफ. ९७८६) धडक दिली. त्यात मालवाहू वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृत चालकाचे नाव अक्षय सुधाकर खिल्लारे (वय २८, रा. किसन नगर, शिवणी, ता. अकोला) असे आहे. एका वाहनास ओव्हरटेक करत असताना त्याच्या पिकअपने महामार्गावर निष्काळजीपणे उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, अक्षय यास गंभीर दुखापत झाली. त्यास तत्काळ ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. मृताचा भाऊ साहिल सुभाष खिल्लारे यांनी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या