भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – शहरातील अप्सरा चौकातील ७० फेरीवाल्यांना (हॉकर्स) मुख्य बाजारातील गणपती मंदिराजवळील मोकळ्या ओट्यांवर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या महिनाभरात या जागेवर पत्री शेड, दिवाबत्तीची व्यवस्था करुन ही जागा भोगवट्याने दिली जाईल. शनिवारी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासोबत हॉकर्स समितीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.शहरातील मुख्य बाजारपेठेतील जामनेर रोडवरील वाल्मीक नगर चौक ते अप्सरा चौक यादरम्यान रस्ता काँक्रिटीकरण करुन दुभाजक टाकण्यात येत आहेत. हॉकर्स बांधवांसोबत चर्चा करताना मंत्री संजय सावकारे, निर्मल कोठारी. आदी उपस्थित होते .
मिरवणुकीला अडथळे नाही
वाल्मीक नगर चौक ते अप्सरा चौक या मार्गावर विविध रॅली, मिरवणुका निघतात. रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकल्यास मिरवणूक मार्गात अडथळे होतील, अशी शक्यता आहे. पण, या मार्गावर सिंगल दुभाजक आहे. मिरवणुकीला अडथळे होणार नाही, अशी चर्चा बैठकीत झाली.
नगरपालिका पथविक्रेता समितीने विरोध दर्शवला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी हॉकर्स बांधवांनी ठिय्या आंदोलन करुन हे काम बंद पाडले होते. या संदर्भात शनिवारी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी तोडगा काढला आहे .अप्सरा चौकातील ७० हॉकर्स बांधवांना जागा देण्यात येणार आहे. यानंतर वाल्मीक चौक ते अप्सरा चौक या मार्गावर इतर कोणतेही अतिक्रमण होऊ नये यासाठी पालिकेला प्रयत्न करावे लागतील. तसे न केल्यास या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होऊन परिस्थिती जैसे थे होईल, अशी शक्यता आहे.
अनेक वर्षा पासून या रस्त्यावर हाकर्स यांचा व्यवसाय आहे त्यांच्या रोजी रोटी चा गंभीर विषय असल्याने स्वतः मंत्री महोदय यांनी यात सहभाग घेतला आहे . मिरवणूकीबाबत ही योग्य निर्णय घेवुन सिंगल दुभाजक टाकण्यात येणार आहे . या विकास कामा ने भुसावळातील मुख्य बाजार पेठ चा रस्ता मोकळा श्वास घेणार आहे