वनविभागाच्या गस्तीपथकाने ५ हजाराच्या साग चौपाट केल्या जप्त
वनविभागाच्या गस्तीपथकाने काल दि.१४ रोजी यावल पूर्व- पश्चिम: वनक्षेत्रात ४ हजार ९०० रुपये किमतीच्या साग चौपाट जप्त केल्याची माहिती दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की,दि.१४ जून २०२५ रोजी संध्याकाळी ५:३० वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी,गस्ती पथक यावल यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार गस्ती पथक स्टाफ व आगार रक्षक यावल यांच्या सह यावल कोरपावली रस्त्याने गस्त करीत दबा धरून बसलो असता आरोपीस आमची चाहूल लागताच विना नंबर मोटार सायकल वरली साग चौपाट नग टाकुन आरोपी मोटार सायकल घेऊन पसार झाला.त्याचा पाठलाग केला असता मिळुन आला नाही.सदर साग चौपाट नग-५ घ.मी.०.१४९ किंमत ४९०० /- रु इतकी किंमतीचा माल जप्त करुन शासकीय वाहनाने मुख्य विक्री केंद्र यावल येथे पावतीने जमा केला. गुन्हे कामी गस्ती पथक यावल यांनी गुन्हा क्रमांक ८/२०२५ दि.१४ जून २०२५ अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.सदरील कारवाई ही उप वनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव,व मा.विभागीय वनअधिकारी सो दक्षता धुळे व सहाय्यक वन संरक्षक सो. ( प्रादेशिक व कॅम्पा ) यावल, वनपरिक्षेत्र अधिकारी सो गस्ती पथक यावल,यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कार्यवाही दरम्यान वनपाल आर.एम.जाधव,आगार रक्षक यावल बी.बी. गायकवाड,
तसेच पोलीस ( कॅा ) एस.आर तडवी वाहन चालक योगीराज तेली उपस्थित होते.