सोशल मीडियावर मेसेजचा राग अनावर झाल्याने एकावर चाकूहल्ला; गुन्हा दाखल!
भडगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या मेसेजचा राग अनावर झाल्याने गॅरेज चालकावर चाकूहल्ला करण्याची घटना भडगाव-बाळद रोडवर घडली. याबाबत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जखमी झालेल्या गॅरेज चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी महेश विश्वनाथ पाटील (२७, बाळद बु, ता. पाचोरा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बाळद खु, येथील आपल्या मित्राची पत्नी ही तिच्या आई-वडिलांकडे निघून गेली होती.
त्यानंतर पतीने पत्नीकडे जावून त्याच्या दोन्ही मुली घरी येथे घेउन आला होता. या मुलींची चौकशी करण्यासाठी त्याच्या पत्नीने महेशला मुलींची खुशाली विचारण्यासाठी सोशल मीडियावर मेसेज केला होता. ही बाब मित्राच्या भावास आवडली नाही. याचा त्यास राग आला होता. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास महेश हा भडगाव बाळदा रोडवरील गॅरेजवर काम करत असताना महेशवर त्याच्या मित्राच्या भावाने चाकूने वार केले.