Thursday, September 17, 2026
Homeजळगावअप्सरा साडी सेंटर समोरील डिव्हायडरला शिवसेना (उबाठा) चा विरोध ; मिरवणुकांना अडथळा...

अप्सरा साडी सेंटर समोरील डिव्हायडरला शिवसेना (उबाठा) चा विरोध ; मिरवणुकांना अडथळा होण्याची भीती!

अप्सरा साडी सेंटर समोरील डिव्हायडरला शिवसेना (उबाठा) चा विरोध ; मिरवणुकांना अडथळा होण्याची भीती!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अहिल्यादेवी कन्या शाळेपासून अप्सरा साडी सेंटरपर्यंत सुरू असलेल्या रस्त्याच्या कांक्रीटीकरण कामामधील डिव्हायडरच्या बांधकामास शिवसेना (उबाठा गट) यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. डिव्हायडरमुळे शहरातील सामाजिक व धार्मिक मिरवणुकांना अडथळा निर्माण होईल, असा दावा करत हे काम त्वरित थांबवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याकडे करण्यात आली आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठेतील हा मार्ग म्हणजे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रमजान ईद, मोहरम यांसारख्या अनेक मिरवणुकांचा परंपरागत मार्ग आहे. या रस्त्यावर डिव्हायडर उभारल्यास मोठ्या प्रमाणात रहदारीची कोंडी, अडथळे आणि अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.शिवसेनेच्या निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, रस्त्याचे कांक्रीटीकरण करण्यास कोणताही विरोध नाही. मात्र, निविदा

 

काढताना स्थानिक लोकांच्या भावना, मिरवणुकांचे पारंपरिक मार्ग, तसेच शहरातील सामाजिक सलोखा यांचा विचार न करता काम सुरू केल्याचे गंभीर प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.या निर्णयावर आक्षेप घेत “आताही वेळ गेलेली नाही, डिव्हायडरचे काम त्वरित थांबवावे,” असा इशारा देण्यात आला आहे. अन्यथा, “शिवसेना स्टाईलने सर्व समाजबांधवांना घेऊन हे काम थांबवण्यात येईल,” आणि यासाठी प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी शिवसेनेचे निलेश महाजन, दिलीप सुरवाडे, गोलू कापडे, शरद जोहरे, योगेश बागुल, पथविक्रेता समितीचे अध्यक्ष राजू सपकाळे, गोपाळ पुरोहित, साजिद बागवान यांच्यासह शिवसेना (उबाठा) पदाधिकारी व पथविक्रेते बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या