वैदयकिय अधिकाऱ्याने केला आरोग्य सेविकेचा विनयभंग ; गुन्हा दाखल!
चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील एका गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय अधिकारी याने पुनर्नियुक्ती प्रस्तावावर सही घेण्यासाठी माझ्या मित्राच्या दुकानावर बोलावले. तेथे आरोग्य सेविकेला अश्लील भाषा वापरून विनयभंग केल्याची घटना दि. ९ रोजी घडली होती. याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकिय अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंग व अट्रॅसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, एका प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका कंत्राटी पद्धतीने नोकरीस आहे. तेथील वैद्यकीय अधिकारी हे त्यांच्या अंगलट येण्याचा प्रयत्न करीत होते. अकरा महिन्यानंतर त्यांच्या पुनर्नियुक्ती प्रस्तावावर वैद्यकीय अधिकारी यांची सही लागत असल्याने त्या दि. ९ रोजी पुनर्नियुक्ती प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला होता. वैद्यकीय अधिकारी राजपूत याने त्यांच्याशी पुन्हा अश्लील भाषा वापरून त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत विनयभंग केला. महिलेने दि. १७ रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे.