Thursday, June 19, 2025
Homeगुन्हाभुसावळात चोरट्यांचा हैदोस! इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या गोडावूनमधून ३५ लाखांचा सामान लंपास

भुसावळात चोरट्यांचा हैदोस! इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या गोडावूनमधून ३५ लाखांचा सामान लंपास

भुसावळात चोरट्यांचा हैदोस! इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या गोडावूनमधून ३५ लाखांचा सामान लंपास

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील आठवडे बाजार परिसरातील डिस्को टॉवर इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या गायत्री नगरमधील गोडावूनमधून चोरट्यांनी ३५ लाख रुपयांचा इलेक्ट्रॉनिक सामान लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे..

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, नंदलाल मिलकीराम मकडीया (वय ६२) हे श्रीहरीनगर, सिंधी कॉलनी, येथील रहिवासी असून, आठवडे बाजारात त्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, हे गोडावून गायत्री नगरमधील रेणुका माता मंदिराजवळ आहे. १५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता, एका ग्राहकाला कुलर दिल्यानंतर मकडीया है गोडावून बंद करून घरी परतले; परंतु १६ जून रोजी सकाळी ८:४० वा. शेजारील व्यापारी जितेंद्र पाचपांडे यांनी फोन करून गोडावूनचे शटर अर्धवट उघडे असल्याची माहिती त्यांना दिली.मकडीया व त्यांचा मुलगा सनी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, गोडावूनचे शटर उचकटलेले दिसून आले. आत तपासणी केली असता, मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरीस गेलेल्याचे लक्षात आले. गोडाऊनमधून ११ फ्रीज, ९ वॉशिंग मशीन, ५८ एसी इंडोअर युनिट्स, ४२ एसी आउटडोअर युनिट्स, ५९ एलईडी टीव्ही (३२ इंच), ४४ एलईडी टीव्ही (४३ इंच), ७ एलईडी टीव्ही (५५ इंच) असा एकूण अंदाजे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे मकडीया यांनी सांगितले आहे.

याप्रकरणी १७ जून रोजी रात्री उशिरा बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोरांचा शोध घेतला जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या