Tuesday, August 25, 2026
Homeआत्महत्याकौटुंबिक वादातून धावत्या रेल्वेखाली तरूणाची आत्महत्या!

कौटुंबिक वादातून धावत्या रेल्वेखाली तरूणाची आत्महत्या!

कौटुंबिक वादातून धावत्या रेल्वेखाली तरूणाची आत्महत्या!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – कौटुंबिक वादातून धावत्या रेल्वेखाली झोकून देत हेमंत अरुण पाटील (वय ३०, रा. दोनगाव, ता. धरणगाव) या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास पाळधी रेल्वे स्टेशन परिसरात घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे राहणारा हेमंत पाटील हा गुजरात राज्यातील भरुच येथील कंपनीत नोकरीला होता. कौटुंबिक वादामुळे तो गेल्या महिन्यांपासून विवंचनेत होता. त्यातूनच शुक्रवार दि. २५ रोजी हेमंत पाटील यांनी पाळधी रेल्वे स्थानक जवळ धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. घटना घडल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाचा मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला होता. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या