बहिणाबाई च्या नावाने एखाद्या एक्सप्रेस ट्रेन का धावू नये – डॉ.प्रकाश कांबळे
जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचालित मराठी विभाग प्रमुख डॉक्टर महिला महाविद्यालयात १४६ वी बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख वक्ते डॉ. प्रकाश कांबळे यांनी थोर कवयित्री या विलक्षण प्रतिभेच्या लेणे होत्या. केवळ खान्देशच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे माणस घडविण्याचे अपूर्व काम त्यांच्या कवितेने केले आहे. इतकेच नव्हे येणाऱ्या पिढ्यातील माणूस घडविण्याचे काम त्यांची कविता करत राहणार आहे. या बहिणाबाईने संपूर्ण महाराष्ट्राला ललामभूत करण्याचे विलक्षण काम केले आहे. तर मग या बहिणाबाईंचे नाव खान्देशातून जाणाऱ्या एखाद्या एक्सप्रेस ट्रेनला का देऊ नये. त्यांच्या नावाने एखादी एक्सप्रेस का धावू नये. असे प्रतिपादन करताच उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थिनींनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून सदरच्या मागणीला जणू दादच दिली. निमित्त होते थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीचे. असे वक्तव्य डॉ.प्रकाश कांबळे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सतीश जाधव यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात बोलतांना ते म्हणाले बहिणाबाईंच्या कवितेतून उन्नत जीवनाचे तत्वज्ञान आलेले आहे त्याची कविता म्हणजे बावनकशी सोन आहे. तसेच विद्यार्थ्यांसह सर्वांनीच बहिणाबाईंच्या कविता वाचून आपल्या जीवनात उतरविली तर आयुष्य अधिक सुंदर होईल. बहिणाई यांची खान्देशी भाषेतील कविता अजरामर आहे . त्यातून बोध घेण्या सारखे शब्द होते . याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी व प्राध्यापक यांनी बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या. कला व सांस्कृतिक समितीच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.निवृत्ती बंगाळ तर आभार प्रा. रेणुका झांबरे यांनी केले. सदर कार्यक्रमास सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

