जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रीक, फेसॲपवर उपस्थिती नोंदविणेबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदेश केव्हा काढणार..?

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक : प्र.क्र. 31/18 (र.व का.), दि. 23 मे, 2022
मा.चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री, महसूल यांचे निर्देश
दि.19 जुलै 2025 स्पष्ट निर्देश आणि आदेश असल्याने जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीचा वापर पुन्हा सुरू करण्याबाबतकरण्याबाबत आदेश केव्हा काढणार याबाबत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
शासन स्तरावरून निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याअनुषंगाने सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रीक प्रणाली सुरू असणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक कार्यालयांतील अधिकारी / कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने नागरीकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत.परिणामी जिल्ह्यातील नागरीकांच्या शासकीय कामास विलंब होत आहे. याअनुषंगाने संदर्भ क्र.2 अन्वये मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री यांनी सर्वशासकीय /निमशासकीय कार्यालयांमधील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी आपली दैनंदिन उपस्थिती बायोमेट्रीक / फेसॲपवर नोंदविणे आवश्यक असल्याचे निर्देश दिले आहेत.तरी संदर्भिय शासन निर्णय तसेच बायोमेट्रीक / फेसॲप वरील दैनंदिन उपस्थिती ही भविष्यात संबंधित अधिकारी
/ कर्मचारी यांचे वेतनाशी संलग्नित करण्यात येणार असल्याबाबत महसूल मंत्री यांनी संकेत दिले असल्यामुळे सर्व विभाग प्रमुख यांनी महोदय यांचे निर्देशान्वये आपल्या कार्यालयात बायोमेट्रीक / फेसॲप प्रणाली त्वरीत कार्यान्वित करून सर्व अधिकारी / कर्मचारी यांची दैनंदिन उपस्थिती नोंदविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. असे आदेश असताना जिल्हाधिकारी जळगाव केव्हा आदेश काढणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे

