अंजाळेतील नंदग्राम सर्व सुविधा युक्त अनोखे पर्यटन स्थळ

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – सध्या शाळा, कॉलेजला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे वेगवेगळे ग्रुप्स, फॅमिली कुठेना कुठे पिकनिकला जाण्याचा प्लान करीत आहेत मात्र ज्यांना गावी किंवा तीन-चार दिवसांसाठी थंड हवेच्या ठिकाणी जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी भुसावळजवळील अंजाळेतील नंदग्राम महत्व पूर्ण पर्वणी ठरणार आहे. पर्यटकांना गो सेवा, कृषी पर्यटन आणि वॉटर पार्कचा अनोखा संगम येथे पहायला मिळणार आहे.

भुसावळपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावरील अंजाळे, ता. यावल येथील नंदग्राम गोधाम अॅग्री टुरिझम व वॉटर पार्क भुसावळ खान्देशातील पर्यटकांना खुणावत आहे. इथे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच वेगवेगळ्या राईडसचा आनंद लुटू शकतात. महत्वाचे म्हणजे हे वॉटर पार्क भुसावळ शहरापासून काही अंतरावर असल्यामुळे तुमचा प्रवासाचा भरपूर वेळ वाचतो.पाचशे रुपयांचे तिकीट काढल्यानंतर पर्यटकांना सुरुवातीला वेलकम ड्रींक, पॉपर्कान, कॉटन कॅण्डी फ्री दिली जाणार आहे या शिवाय पीक सीटी (फोटो पार्क), गो तीर्थ (म्युझियम), आपले गाव, बोटींग, शौर्यवन, बालवन (किडस पार्क), पीक्सो पार्क (सेल्फि पार्क), स्विमींग पुलाचा आनंद लुटता येणार आहे. लहानापासून वृद्धांपर्यंत व्यक्तींना आनंद देणारे हे ठिकाण आपल्याच परिसरात उपलब्ध आहे .
पर्यटक ग्रुपने आल्यास त्यांना विशेष सवलत दिली जाणार आहे. वॉटर पार्कच्या अधिक माहितीसाठी 9112 9112 48 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संचालक अभिलाष नांगला यांनी केले आहे.

