Thursday, April 30, 2026
Homeगुन्हाग्रामपंचायत अधिकारी ५० हजार रुपयाची लाच घेताना जळगाव येथील लाच् लुचपत प्रतिबंधक...

ग्रामपंचायत अधिकारी ५० हजार रुपयाची लाच घेताना जळगाव येथील लाच् लुचपत प्रतिबंधक विभाग जाळ्यात अडकला.

ग्रामपंचायत अधिकारी ५० हजार रुपयाची लाच घेताना जळगाव येथील लाच् लुचपत प्रतिबंधक विभाग जाळ्यात अडकला!

यावल खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – लाच लुचपत प्र.वि.जळगांव यांनी आज गुरुवार दि.३० एप्रिल २०२६ रोजी अमळनेर तालुक्यातील नगाव बु.येथील ग्रामपंचायत अधिकारी लोकसेवक रविंद्र देविदास पवार, वय ४८ वर्षे, जिल्हा परिषद यांनी लाच रक्कम स्विकारल्याने त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायदयान्वये कारवाई केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यातील तक्रारदार यांचे चुलत भाऊ यांना १५ वा वित्त आयोग अंतर्गत नगाव बु ता.अमळनेर येथे आर सि.सी गटार बांधकाम करण्याचे व पेव्हर ब्लॉक बसविण्याचे १२,००,०००/- रुपयांचे दोन कामांचे टेंडर मिळाले होते.सदर कामांचे १२,००,०००/- रुपयांचे बिल मंजुर करुन दिल्याचा मोबदला म्हणुन सदर रक्कमेच्या ७ टक्केप्रमाणे आलोसे यांनी तक्रारदार यांनी दि. २४.०४.२०२६ रोजी ८४,०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी केली होती.त्यानंतर तक्रारदार यांनी दि.३०.०४.२०२६ रोजी ला. प्र. वि.जळगांव यांच्याकडे तक्रार केली होती.सदर तक्रारीच्या
अनुषंगाने पंचासमक्ष अमळनेर शहरातील केलेनगर येथील आलोसे यांच्या राहत्या घरी लाच मागणी पडताळणी केली असता यातील आलोसे यांना तक्रारदार यांच्याकडे एकुण कामाच्या ७ टक्के प्रमाणे प्रथम ८४,०००/- रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी १३,००० /- रुपये यापुर्वीच फोन पे ने स्विकारले असल्याचे मान्य करुन तडजोडी अंती ५०,०००/- रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वतच्या घरी स्विकारताना मिळुन आला, म्हणुन यातील आलोसे (आरोपी लाच घेणारा ) यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सापळा यशस्वीपणे रचण्याची कारवाई भारत तागंडे,पोलीस अधिक्षक,ला.प्र.वि नाशिक परिक्षेत्र नाशिक माधव रेडडी,अपर पोलीस अधिक्षक,ला.प्र.वि नाशिक परिक्षेत्र नाशिक सुनिल दोरगे,अपर पोलीस अधिक्षक,ला.प्र.वि नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर पोलीसउप.अधिक्षक,मो.क्र.९७०२४३३१३१.सापळा अधिकारी हेमंत नागरे,पोलीस निरीक्षक तपास अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक सापळा पथक पोउपनिरी / दिनेशसिंग पाटील, पोउपनिरी / सुरेश पाटील पोहेकॉ / बाळु मराठे, पोहेकॉ / किशोर महाजन, पोहेकॉ / सुनिल वानखेडे, पोकॉ / भुषण पाटील, पोकॉ / मनोज पाटील, पोकॉ / प्रणेश ठाकुर, पोकॉ/ अमोल सुर्यवंशी, पोकॉ/सचिन चाटे यांनी केली
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या