सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रेनी डे साजरा.

यावल दि.२८ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘ रेनी डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आज सोमवार दि.२८ जुलै २०२५ रोजी सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश मीडियम मध्ये प्री- प्रायमरी या वर्गांचा रेनी डे म्हणजेच पावसाळी दिवस च आनंदाने साजरा करण्यात आला .
सर्व विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी छत्र्या व रेनकोट आणले होते व विद्यार्थ्यांनी पावसाच्या गाण्यांवर श्रावण सरींचा आनंद घेत डान्स केला
हा कार्यक्रम शाळेचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम यांच्या उपस्थित घेण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्री प्रायमरीचे शिक्षिका सौ. तेजस्वीनी वाणी मॅडम,
समीना तडवी मॅडम,सविता बारी मॅडम,मनिषा बडगुजर मॅडम व कुसूम फालक यांनी परिश्रम घेतले .

