Friday, May 1, 2026
Homeजळगावआमदार अमोलभाऊ जावळे यांची तत्परता — दिव्यांग युवकाच्या व्यथेला मिळाले समाधान.

आमदार अमोलभाऊ जावळे यांची तत्परता — दिव्यांग युवकाच्या व्यथेला मिळाले समाधान.

आमदार अमोलभाऊ जावळे यांची तत्परता — दिव्यांग युवकाच्या व्यथेला मिळाले समाधान.

यावल दि.२८  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला रावेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोलभाऊ जावळे उपस्थित होते. शिबिरादरम्यान घडलेला एक हृदयस्पर्शी प्रसंग सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

शिबिरात गौरव छोटू भालेराव या दिव्यांग युवकाने आमदार अमोलभाऊ जावळे यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. युवकाची व्यथा ऐकून आमदार जावळे यांनी विलक्षण तत्परता दाखवली. त्यांनी तात्काळ फैजपूरचे उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे आणि रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांना घटनास्थळी बोलावले.

अधिकार्‍यांनीही आमदारांच्या सूचनेनुसार त्वरित कार्यवाही करत निराधार अनुदान योजनेअंतर्गत अर्ज स्वीकृत करून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली.मंजुरी मिळाल्यानंतर स्वतःउपविभागीय अधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार बंडू कापसे, कुंभारखेड्याचे सरपंच भरत बोंडे, भाजपा तालुकाध्यक्ष अँड.प्रा. सूर्यकांत देशमुख,कपिल चौधरी व इतर कार्यकर्त्यांनी गौरव भालेराव यांच्या घरी जाऊन मंजुरीचे प्रमाणपत्र सुपूर्द केले.
या तात्काळ निर्णयामुळे परिसरातील ग्रामस्थ व लाभार्थ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, “समाधान शिबिर हे केवळ नावापुरते नसून, ते कृतीतून समाधान देणारे ठरत आहे” हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ग्रामस्थांनी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे मनःपूर्वक कौतुक करत आभार मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या