यावल येथील गॅस एजन्सीच्या मनमानी कारभाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष यांची तक्रार.

यावल दि.३० खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी यावल येथील भारतीय पेट्रोलियम गॅस एजन्सी,हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस एजन्सी यांचा मनमानी कारभार सुरू असल्याने त्यांनी घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष आकाश चोपडे यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे.
यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आली आहे की,गॅस सिलेंडर मधून काही प्रमाणात गॅस काढून विक्री करीत आहे, तसेच यावल तालुक्यात अवैधरित्या गॅस सिलेंडर मधून गॅस काढून गॅस बरोबर प्रमाणात विक्री होत आहे ग्राहकांना शासन नियमाप्रमाणे गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करताना सिलेंडर वजन काट्यावर मोजून दिले जात नाही व जो गॅस नागरिकांना ठराविक दिवस पुरायला पाहिजे तेवढे दिवस तो गॅस पुरत नाही ही ग्राहकांची सर्रास लूट आहे याबाबत आपण चौकशी करून कार्यवाही करावी.
तसेच बुरुज चौकातील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपावर शासनाचे सर्व नियम अटी शर्ती धाब्यावर ठेवून पेट्रोल डिझेल विक्री होत आहे, पेट्रोल पंपावर प्रथम उपचार किट व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच पेट्रोल डिझेल टेस्ट रिपोर्ट देखील घेण्यात यावा व त्याच्या गुणवत्तेची चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन वजा तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष आकाश चोपडे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील,युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश पाटील,किरण महाजन,प्रेम देवरे,हेमू देवरे,बंटी बारी,हर्षल राजपूत इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

