यावल येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे वित्तीय साक्षरता अभियान आणि भव्य कर्ज वाटप मेळावा.

यावल दि.३१ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी यावल येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने आज दि.३१ जुलै २०२५ रोजी यावल तालुक्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना आर्थिक साक्षरता व भव्य कर्ज वाटप मेळावा आयोजित करून त्यात प्रामुख्याने वित्तीय साक्षरता अभियान राबविले.
तालुक्यातील एकूण १० स्वयंसहायता समूहांना ३०.२५ लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात आले.सदरील मेळाव्यासाठी मा. सचिन सूर्यभान काकडे शाखा व्यवस्थापक यावल,शरद शेंडे आणि अमोल झाडे MSRLM यावल यांची प्रमुख उपस्थीती होती.
सदरील मेळाव्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या बँक सखींचा सत्कार करण्यात आला.तसेच बँकेचे कर्ज घेऊन वैयक्तिक व सामूहिक व्यवसाय करणाऱ्या उद्योजक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते यावल तालुक्यातील स्वयंसहाय्यता बचत गटांना टना कर्ज मंजुरी पत्र व प्रतिनिधीक स्वरूपातील चेक चे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन काकडे सर यांनी बँकेच्या विविध योजना व त्यातून मिळणारा लाभ याविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. बँकेच्या कर्जातून महिलांनी स्थानिक पातळीवर विविध उद्योग व्यवसाय निर्माण करावे व ऑनलाईन स्तरावर माध्यमांचा वापर करून त्याची विक्री चांगल्या प्रकारे करावी असे आवाहन केले. तसेच त्यांनी गटांना कर्ज वितरण कोणत्याही आडकाठी शिवाय व जास्तीत जास्त रक्कम देण्याचे ही आश्वासन दिले.
उमेदचे तालुका समन्वयक अमोल सर आणि शेंडे सर यांनी उमेद गटाविषयी सविस्तर माहिती दिली व कर्ज परतफेडीचे प्रमाण शंभर टक्के राहील याची ग्वाही दिली. यावल शाखेची अधिकारी जानवी खोडे,वैशाली नगराळे व रोखपाल चेतन सिंह राजपूत यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.शाखेचे शिपाई महेश खाचणे,भूषण महाजन व बँक सखी अश्विनी कोळी यांनी उपस्थित होते,यावल सारख्या ग्रामीण भागात जवळ जवळ शतकी महिलांच्या उपस्थितीत भव्य असा कर्जवाटप मेळावा आयोजित करण्यात आला व उमेद मधील महिलांनी कार्यक्रमला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

