Sunday, August 3, 2025
Homeजळगावमहसूल सप्ताह निमित्त अतिक्रमित रस्ते मोकळे करून लोकप्रतिनिधी सह वृक्षारोपण

महसूल सप्ताह निमित्त अतिक्रमित रस्ते मोकळे करून लोकप्रतिनिधी सह वृक्षारोपण

महसूल सप्ताह निमित्त अतिक्रमित रस्ते मोकळे करून लोकप्रतिनिधी सह वृक्षारोपण

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               महसूल सप्ताह 2025 निमित्त भुसावळ तालुक्यातील विविध महसुली गावांतील अतिक्रमणमुक्त करण्यात आलेल्या पांदण व शिवार रस्त्यांवर दुतर्फा वृक्ष लागवडीचा अनुकरणीय उपक्रम राबवण्यात आला

Oplus_131072

. या उपक्रमाअंतर्गत एकूण 37 रस्ते मोकळे व वाहतुकीसाठी खुले करण्यात आले असून, त्या ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्यात आली आहे.

मौजे ओझरखेडे येथे उपविभागीय अधिकारी श्री. जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच मंडळ अधिकारी वरणगाव यांच्या सहभागातून अतिक्रमित शिवरस्त्यावर दोन्ही बाजूंनी वृक्ष लागवड करण्यात आली.

तसेच मौजे हातनूर येथे अलीकडेच मोकळा करण्यात आलेल्या रस्त्यावर तहसीलदार सौ. नीता लबडे, सरपंच उज्वला तायडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन इंगळे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

मौजे टहाकळी येथेही तहसीलदार सौ. नीता लबडे यांच्या उपस्थितीत अतिक्रमणमुक्त शेत रस्त्यावर वृक्ष लागवड करण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने आजूबाजूचे शेतकरी उपस्थित होते.

याशिवाय, तालुक्यातील इतर महसुली गावांमध्ये नायब तहसीलदार प्रीती लुटे, पूजा अवघडे, जितेंद्र पाडवी, तसेच मंडळ अधिकारी प्रवीण पाटील, वैशाली पाटील, रजनी तायडे आणि सर्व ग्राम महसूल अधिकारी यांच्या पुढाकाराने मोकळ्या रस्त्यांवर वृक्षारोपण करण्यात आले.

या संपूर्ण अभियानामध्ये महसूल प्रशासनाने केवळ अतिक्रमण हटवण्यापुरते न थांबता, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करत पर्यावरण संवर्धनाचा महत्वाचा संदेश दिला आहे. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग व सहकार्यामुळे या उपक्रमाला विशेष यश लाभले असून, भविष्यात हे रस्ते सुंदर व हरित मार्ग म्हणून उभे राहणार आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या