महसूल दिन साजरा… पण कर्मचाऱ्यांकडूनच दुर्लक्ष!
मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी राज्यभर दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा महसूल दिन यंदा मुक्ताईनगरमध्येही साजरा करण्यात आला. संत मुक्ताबाई महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात
यावेळी कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत पाटील तहसीलदार गिरीश वखरे नायब तहसीलदार निकेतन वाळे नायब तहसीलदार प्रदीप झामरे हे मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर रमेश शेवाळे यांनी केले आमदार चंद्रकांत पाटील व तहसीलदार गिरीश वखारे यांच्या हस्ते काही कर्तव्यदक्ष महसूल कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परंतु या कार्यक्रमात एक बाब प्रकर्षाने जाणवली –
बरेचसे तलाठी आणि कोतवाल अनुपस्थित होते. महसूल विभागात काम करणारे कर्मचाऱ्यांनीच महसूल दिनाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. तहसीलदारांनी विशेषतः उपस्थित राहण्याचे आवाहन केले असतानाही काही कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत ‘केराची टोपली’ दाखवली.
आपण ज्या विभागात काम करतो, त्या विभागाच्या गौरवदिनात सहभागी होणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची नैतिक जबाबदारी असते. मात्र यंदा महसूल दिनाच्या कार्यक्रमात दिसलेली कर्मचाऱ्यांची उदासीनता ही खेदजनक बाब ठरली आहे.