महसूल सप्ताह निमित्त छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर उत्साहात पार पडले
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी भुसावळ, दि. ४ ऑगस्ट २०२४ – महसूल सप्ताह २०२४ निमित्त आज भुसावळ महसूल मंडळ अंतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय, भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर उत्साहात पार पडले.
या शिबिराला महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोउद्योग मंत्री मा. ना. श्री. संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी लाभार्थी यांच्या काही अडी अडचणी बाबत अधिकारी यांनी वेळोवेळी शिबिर आयोजित करून माहिती द्यावी असे मार्गदर्शन करण्यात आले .
शासन निर्णयातील तरतुदीनुसार, नागरिकांना विविध शासकीय सेवा एका छताखाली देण्याच्या उद्देशाने अनेक विभागांचे स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आले होते. या शिबिरामध्ये लाभार्थ्यांना लाभ मंजुरीचे प्रमाणपत्र आणि दाखले मंत्री महोदयांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या समस्या, अडचणी ऐकून घेण्यात आल्या आणि त्याचे तात्काळ निराकरण करण्यात आले. मंत्री महोदयांनी ७/१२ संगणकीकरणाच्या प्रक्रियेत मागील काळात झालेल्या त्रुटी लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.
सदर कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी श्री. जितेंद्र पाटील, तहसीलदार सौ. नीता लबडे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उद्धव डमाळे, नायब तहसीलदार शोभा घुले, प्रीती लुटे, जितेंद्र पाडवी, मंडळ अधिकारी प्रफुल्ल कांबळे, तलाठी मंगेश पारिसे, तेजस पाटील, बाळासाहेब गायकवाड, सोनाली कोळी, कोतवाल रवींद्र धांडे, जितेश चौधरी, सुपडू मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी व सामान्य नागरिक उपस्थित होते.