मुख्य जलवाहिनी वरून वाशिंग सेंटरला २४ तास मोफत पाणीपुरवठा
न.प. प्रशासनाचा भोंगळ कारभार
मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरात नगरपंचायत हद्दीतील दोन वाशिंग सेंटरला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरून २४ तास मोफत पाणीपुरवठा केला जात असून वारंवार तक्रारीनंतर मुख्याधिकारी यांनी पाणी पुरवठा निरीक्षक यांना सदर अवैध नळ कनेक्शन तपासून कट करण्याचे आदेश एप्रिल महिन्यात दिले होते परंतु चार महिने उलटूनही पाणीपुरवठा निरीक्षकांनी अवैधरित्या सुरू असलेले नळ कनेक्शन कट न केल्यामुळे नगरपंचायत प्रशासनाच्या या भोंगळ व भ्रष्ट कारभाराबद्दल शहरात तीव्र नाराजी व असंतोष आहे.
शहरात अनेक वाशिंग सेंटर असून काही वाशिंग सेंटरला स्वतःच्या मालकीच्या खाजगी ट्यूबवेल द्वारे पाणीपुरवठा होत असून शहरातील बऱ्हाणपूर रोडवरील मुस्लिम कब्रस्तान लगत असलेल्या २ वाशिंग सेंटरला नगरपंचायत मालकीच्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन वरून २४ तास पाणीपुरवठा करणारे नळ कनेक्शन अवैधरित्या जोडले असून त्या अनुषंगाने दिवसाकाठी हजारो रुपयांची आर्थिक उलाढाल सदर वाशिंग सेंटर द्वारे होत असून सदर वॉशिंग सेंटरच्या अनुषंगाने नगरपंचायत कडून आस्थागायात कोणतीही परवानगी घेण्यात आली नसून एक रुपयाचा महसूलही नगरपंचायत प्रशासनाकडे वाशिम सेंटर मालकांनी जमा केला नसल्याचे माहिती अधिकार अर्जात उघड झाले आहे. या वाशिंग सेंटरला मुख्य जलवाहिनी वरून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून बहुतांश नागरिकांना मोटर लावून सुद्धा पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे या नगरपंचायत प्रशासनातील या अवैध वाशिग सेंटरच्या मास्टर माईंड चौकशी होऊन आज तागायत नगरपंचायत चा बुडवलेला महसूल कर तात्काळ जमा करण्यात येऊन नगरपंचायत हद्दीतील शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन वरून वाशिग सेंटरसाठी विनापरवाना अवैधरित्या जोडलेले नळ कनेक्शन कायमस्वरूपी बंद करण्यात यावे व पाण्याचा होणारी चोरी थांबवावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.