नाभिक समाज महामंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन सोनवणे ,किशोर वाघ यांची निवड
खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी जळगाव येथे आयोजित नाभिक समाज स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला नाभिक महामंडळाचे कार्याध्यक्ष दामोदर बिडवे, प्रदेश सचिव पांडुरंग भंवर, महिला प्रदेशाध्यक्ष भारतीताई सोनवणे, कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव सलोने, किशोर सुर्यवंशी, सुनिलजी बोरसे, रविंद्र शिरसाठ, मावळते अध्यक्ष रविंद्र नेरपगार, उपाध्यक्ष प्रशांत बाणाईत ,शिवाजी बहाळकर, उमाकांत निकम, सचिव संजय पवार उपस्थित होते. सुरुवातीला दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी
स्नेह मेळाव्याचे उद्घाटन केले.
याप्रसंगी नाभिक महामंडळाच्या नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली. जळगाव जिल्ह्याच्या पूर्व विभागासाठी सचिन सोनवणे आणि पश्चिम विभागासाठी किशोर मधुकर वाघ यांची निवड करण्यात आली. तसेच, कार्याध्यक्षपदी चंद्रकांत शिंदे आणि सरचिटणीसपदी संजय पवार (पत्रकार) यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी राज्यध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या हस्ते किशोर सैंदाणे, उपसंपादक सतिष बोरसे, पत्रकार संजय पवार, अँड. भरत ठाकरे, होमगार्ड लिपिक हिरालाल नेरपगारे, संजय वखरे, हभप सरला वाघ, देवराव वाघ, पुण्याशोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार भारतीताई सोनवणे यांच्यासह मावळते जिल्हाअध्यक्ष रविंद्र नेरपगार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

खाप्रसंगी दळे यांनी सांगितले की शासनाच्या उदासीन धोरणांमुळे बारा बलुतेदार समाजाचा विकास खुंटला असून शासनाने सत्तेत येण्यापूर्वी केलेल्या घोषणा – केवळ पोकळ ठरल्या आहेत, अशी खंत नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष कल्याणराव दळे यांनी व्यक्त केली. शासनाकडून निधी नाकारला जात असल्यामुळे ही समाजाची शुद्ध फसवणूक असल्याचेही त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन ह.भ.प. मनोहर खोंडे यांनी केले तर आभार अनिल शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदीश वाघ, अरुण श्रीखंडे, जगदीश निकम, गणेश सानवणे, भरत चव्हाण, प्रशांत बाणाईत, भिकन बोरसे, अभय सुर्यवंशी, नरेश गर्गे, पंडीत संनासे, शांताराम सोनगिरे, उदय सोनवणे, वसंतराव साळुंखे, शिवाजी निकम, किरण नांद्रे, कैलास वाघ, आत्माराम शिंदे, विशाल निकम यांनी परिश्रम घेतले.“`

