प्रा. शुभम सूरवाडे यांची अब्दुल कलाम विद्या भूषण पुरस्कारा साठी निवड

फैजपूर – खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी देश की बात फौंडेशन तर्फे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विद्याभूषण नॅशनल अवार्ड 2025 हा पुरस्कार येथील प्रा शुभम मनोहर सूरवाडे यांची निवड करण्यात आली आहे . ही निवड फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल राय , महाराष्ट्र चे संयोजक संदीप पाटील, ईश्वर पाटील यांनी केली आहे. देशात सामाजिक सकारात्मक राष्ट्रीय भावना जागृत करणे,सामाजिक , शैक्षणिक, आर्थिक, राजनैतिक , पर्यावरण विचार जागृत करणे तसेच नेतृत्व क्षमता व व्यक्तिमत्व विकासासाठी हा पुरस्कार दिला जातो . प्रा. शुभम सुरवाडे हे येथील धनाजी नाना महाविद्यालय चे उपप्राचार्य प्रा डॉ. मनोहर सूरवाडे यांचे चिरंजीव असून ते सध्या धुळे येथील पालेशा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत .

