मॉडेल सौर ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातील पाच गावांचा समावेश.
यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावाची निवड.
केंद्र सरकारची योजना प्रथम क्रमांक आल्यास गावाला १ कोटी मिळणार…
यावल दि.१७ खानदेश लावी न्यूज प्रतिनिधी मॉडेल ग्राम” स्पर्धेत केंद्र सरकार योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पाच गावांची निवड करण्यात आली असून त्यात यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावाचा समावेश आहे या योजनेअंतर्गत प्रथम क्रमांक आल्यास केंद्र सरकार त्या गावाला एक कोटी रुपये निधी देणार आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यातून कोणती ग्रामपंचायत क्र.१ ठरणार याकडे आता संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव आणि फूलगाव तसेच जळगाव तालुक्यातील आसोदा,पाचोरा तालुक्यातील जारगाव, आणि यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावाची निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावाला हा मान मिळाल्याने येत्या सहा महिन्यात गावातील जास्तीत जास्त कुटुंब सूर्यग्रह योजनेत सहभागी व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा आहे या स्पर्धेत ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला तर केंद्र सरकारकडून एक कोटीचे बक्षीस मिळेल या उद्देशाने गावात यावल येथील विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी,कर्मचारी यांनी जनजागृतीसाठी ग्रामस्थांचा लक्षवेधी असा कार्यक्रम घेतला.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ देशातील प्रत्येक जिल्ह्याला मिळत आहे. आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गावांना मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘ मॉडेल सौर ग्राम’ स्पर्धा घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सांगवी बुद्रुक गावात शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी वीस वितरण कंपनीतर्फे जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी यावल येथील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता गणेश महाजन,उप कार्यकारी अभियंता नितीन पाटील,
सहाय्यक अभियंता आकाश नेहेते, सहाय्यक अभियंता गौरव बाविस्कर, सहाय्यक अभियंता राहुल कवठे, सरपंच रशी तडवी,उपसरपंच अतुल फिरके, उल्हास निंबा चौधरी, भालचंद्र वसंत बंगाळे चंद्रकुमार निंबा चौधरी, विकास पंढरीनाथ धांडे, योगेश दिलीप भंगाळे,सुरेश रामचंद्र चौधरी, अशोक सेवकराम चौधरी भागवत वसंत बोरोले,ग्रामसेवक, दिलीप सिताराम धनगर,शरद एकनाथ पाटील,सहाय्यक अभियंता चेतन ठाकूर इत्यादी वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी ग्रामस्थांना प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेची माहिती दिली त्यात ग्रामस्थांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.
लाभार्थीस सबसिडी अशा प्रकारे मिळणार….
सौर ऊर्जा पॅनल बसविण्यासाठी घरगुती ग्राहकांना एक केव्ही साठी ६० हजार रुपये खर्च येतो तसेच ३० हजार सबसिडी मिळते,२ केव्ही साठी १ लाख २० हजार खर्च येईल त्यासाठी ६० हजार सबसिडी, ३ हजार केव्ही साठी २ लाख खर्च व ७८हजार सबसिडी मिळणार आहे