यावल येथील तहसील कार्यालयात
भारतीय स्वातंत्र दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम उत्साहात साजरा.
यावल दि.१७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम नियोजन पूर्वक तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी पोलीस व होमगार्ड पथकांने मानवंदना दिली.
यावेळी यावल शहरासह तालुक्यातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,समाजसेवक,निवासी नायब तहसीलदार बी.एम.पवार,नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, रशीद तडवी,मनोज खारे,सर्कल तलाठी कोतवाल,यांच्यासह कार्यालयीन इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस उप निरीक्षक अनिल महाजन यांनी ध्वजारोहणास मानवंदना दिली. यावेळी शालेय विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले.तसेच तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी स्वतः व उपस्थितांसह तंबाखू व अमली पदार्थ सेवनापासून लांब राहण्याची शपथ घेतली.