रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस – नदी नाले तुडुंब भरले, जनजीवन विस्कळीत
निंभोरा प्रतिनिधी खानदेश ला इंग्लिश प्रवीण शेलोवडे
खिडीं रावेर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून रविवारी दुपारपासून सुरु झालेला पाऊस रात्रभर सुरू राहिला. सकाळपर्यंत संततधार पाऊस झाल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे.
सततच्या पावसामुळे शेतशिवारात पाणी साचले असून सोयाबीन, कापूस, मका या पिकांना दिलासा मिळाला आहे. तर काही ठिकाणी केळी, कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्याने नुकसान होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. रस्ते व गावे जोडणारे लहान पूल पाण्याखाली गेल्याने अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. यामुळे अनेक गावांमधील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
नदी-नाल्यांच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
संबंधित प्रशासनाने नागरीकांनी सतर्क राहावे असे आवाहन केले आहे .