प्रसिद्धी माध्यमातून शेतकरी, जमीनधारक यांची दिशाभूल झाल्याने प्रभारी प्रांताधिकारी यांना खुलासा करावा लागला.

यावल दि.१८ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी गुजरात महाराष्ट्र व मध्य प्रदेश या तीन राज्यांना जोडणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सुपीक जमीन जाणार तसेच बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग भूसंपादनाची अधिसूचना जारी ! अशा प्रकारच्या बातम्या ठराविक १ ते २ वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्याने यावल रावेर तालुक्यातील शेतकरी व जमीनदार यांची दिशाभूल झाल्याने शेतकरी जमीनदार चौकशी कामी फैजपूर भाग फैजपूर प्रभारी उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्याकडे गेल्याने प्रभारी प्रांताधिकारी यांना आज एक जाहीर प्रसिद्धी पत्रक काढावे लागले.
प्रसिद्धी पत्रक प्रत्यक्ष बघितले असता प्रभारी उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकावर
दिनांक नमूद न करता प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की,
भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-753 BE तळोदा ते ब-हाणपूर चौपदरीकरणा बाबत राजपत्र कलम 3 (A) ची अधिसूचना सोशल मिडिया व व्हाट्सअप ग्रुप वर प्रसिध्द होत आहे.
सदर सोशल मिडिया व व्हॉटसअॅप ग्रुप वर प्रसिध्द झालेल्या अधिसूचनेबाबत रावेर व यावल तालुक्यातील शेतकरी / जमीनधारक इकडील कार्यालयात चौकशी कामी येत आहे. तरी भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-753 BE तळोदा ते ब-हाणपूर चौपदरीकरणा बाबत राजपत्र कलम 3 (A) ची अधिसूचना इकडील कार्यालयाकडून अद्यापपावेतो प्रसिध्द करण्यात आली नाही याची सर्व संबंधित शेतकरी / जमीनधारक यांनी नोंद घ्यावी.असे नमूद करून प्रसिद्धी पत्रकावर निवृत्ती गायकवाड प्रभारी उपविभागीय अधिकारी फैजपुर भाग फैजपूर यांची स्वाक्षरी आहे.

