बेटावद येथील तरुणाच्या खुनामागील निर्दयी संघटित गुन्हेगारांची एसआयटी चौकशीची मागणी केली यावल तालुका महाविकास आघाडीने

यावल दि.२० खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी बेटावद तालुका जामनेर येथील तरुणाचा अमानुष,निर्दयी संघटित गुन्हेगारांनी खून केल्याने संबंधित आरोपींची आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत एसआयटी चौकशी करण्याची मागणी यावल तालुका महाविकास आघाडीचे अनुक्रमे अध्यक्ष शेखर सोपान पाटील, प्राध्यापक मुकेश येवले यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावल तहसीलदार व यावल पोलीस निरीक्षक यांच्याकडे आज दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी वर विषयांकित मयतास २५ / ३० निर्दयी गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी
अमानुषपणे मारहाण करुन चौकात नागरिकांसमोर मॉब लीचींग करून ठार मारले आहे.या बाबत ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.परंतु मयताची आई व बहिण यांना मारहाण व जखमी करणारा पावन बावस्कर
हा मोकळा फिरत आहे असे मयतांच्या घरच्यांचे आरोप आहे.सदर इसम मयतास मारत असताना इतरांना चिथावणी देत होता असाही त्यांचा आरोप आहे. याबाबत संबंधितांनी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कासार साहेब यांना माहिती दिली असता त्यांनी याबाबत गांभीर्याने
दाखल घेतलेली दिसत नाही.तरी याबाबत योग्य ती कार्यवाही आवश्यक आहे.एकंदरीत घटनाक्रम पाहता मयत व्यक्तीस सुमारे २०/२५ लोकांनी वेगवेगळ्या अश्या ४ ते ५ ठिकाणी एकत्रित व संघटीत होऊन मारहाण करत सदर अपराध केलेला आहे. त्यामुळे संघटीत गुन्हेगारी अंतर्गत
मोकाकाचा गुन्हा दाखल होणे आवश्यक वाटते. तसेच ज्या पद्धतीने गुन्हा घडविण्यात आला आहे त्या घटनेकडे पाहता याचे धागेदोरे फार
लांब पर्यंत गेलेले दिसतात.याचा सखोल तपास होऊन भविष्यात पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा गुन्हेगारांकडून
घडू नये यासाठी एस.आय.टी.मार्फत खोल पर्यंत जाऊन याचा मुळासकट तपास होणे आवश्यक वाटते.कारण
अतिशय निर्दयपणे व संघटीत होऊन निर्दयपणे कायद्याचा कुठलाही धाक न बाळगता सराईतपणे गुन्हा घडलेला दिसत आहे.त्याकरिता एस.आय.टी. चौकशी तसेच आय.पी.एस.दर्ज्याचा वरिष्ठ अधिकारी मार्फत चौकशी असे निवेदन देण्यात आले असून निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना माहितीसाठी पाठवण्यात यावे असे नमूद करून निवेदनावर तालुका अध्यक्ष शेखर पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मुकेश येवले,अतुल वसंतराव पाटील,मोहम्मद हकीम, मोहम्मद याकूब, इक्बालखान नसीरखान,अनिल जंजाळे, सुखदेव बोदडे, गुलाम रसूल हाजी गुलाम दस्तगीर, हाजी शेख फारूक, शेख निसार,मोहम्मद रफीक,शरीफुद्दीन
सीराजुद्दीन,उमर अली, शेख असलाम शेख नबी, अमोल वेरूळ शेख अखिलउद्दीन नसीमुद्दीन यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी केली आहे.

