के. नारखेडे विद्यालयाचे माजी विद्यार्थी सौरभ चौधरी यांचे पुस्तक प्रकाशित
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अट्रावल येथील के. नारखेडे विद्यालयाचे माजी विद्यार्थी सौरभ चौधरी यांनी सरदार पटेल विद्यापीठ, संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. धर्मेश रायकुंडलीया यांच्या मार्गदर्शनाखाली “Statistical Analysis Made Simple Using Microsoft Excel” हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
हे पुस्तक संख्याशास्त्र, वैद्यकीय, शारीरिक शिक्षण, योगिक विज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, मानसशास्त्र तसेच शिक्षणशास्त्र व संशोधन क्षेत्रातील विद्यार्थी व अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये Microsoft Excel च्या साहाय्याने केस स्टडी आधारित उदाहरणे टप्प्याटप्प्याने व सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आली आहेत.
या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळचे संस्था सेक्रेटरी श्री पी. व्ही. पाटील साहेब यांनी सौरभ चौधरी यांचा सत्कार करून गौरव केला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. वाय. एन. झोपे , उपमुख्याध्यापिका श्रीमती. संगीता अडकमोल मॅडम , संगणक विभाग प्रमुख श्री. बी. ए. पाटील सर , पर्यवेक्षक श्री. एस. पी. पाठक , श्री. बी. बी. जोगी , श्री.एस.एस. कापसे , श्री.प्रशांत चौधरी तसेच सौरभ चौधरी यांचे वडील श्री. राजेंद्र चौधरी हे सुद्धा याप्रसंगी उपस्थित होते. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. श्री. मकरंद नारखेडे साहेब यांनी या विद्यार्थ्याचे अभिनंदन केलेले आहे व भविष्यातील वाटचालीसाठी त्यास शुभेच्छा दिलेल्या आहेत.
गेल्या दशकापासून चौधरी हे संख्याशास्त्रीय विश्लेषक व प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून सध्या ते विविध शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी व संशोधकांसाठी कार्यशाळांचे आयोजन करतात तसेच संशोधन प्रकल्पांसाठी मार्गदर्शन करतात.