अपघातग्रस्ताला आमदार अमोलभाऊ जावळे यांची तातडीची मदत
फैजपूर l खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
फैजपूर-हंबर्डी मार्गावरील चोरवड येथे दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी श्री. प्रमोद लहानू रजाने यांचा दुर्दैवी अपघात झाला. अपघात झाल्यानंतर काही काळ रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असतानाच, योगायोगाने या मार्गाने प्रवास करीत असलेले रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांची नजर या अपघाताकडे गेली.

अपघातग्रस्ताला पाहताच अमोल भाऊंनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने आपली गाडी थांबवली. स्वतः पुढाकार घेत त्यांनी श्री. रजाने यांना गाडीत घेतले आणि थेट फैजपूर येथील रुग्णालयात दाखल केले. रुग्णाला त्वरित वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी आमदार जावळे यांनी डॉक्टरांशी संवाद साधून आवश्यक ती सर्व चौकशीही केली.
अचानक घडलेल्या या प्रसंगात आमदार अमोलभाऊ जावळे यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता ही केवळ मदत नसून खरी माणुसकीचे दर्शन घडवणारी आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून संकटाच्या क्षणी सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धाव घेणारा नेता म्हणजेच खरा जनसेवक, अशी भावना स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.