बहुजन समाजातील सामाजिक समूहाचे बुथ लेवलवर संघटनात्मक जाळे निर्माण केल्याशिवाय राष्ट्रव्यापी जन आंदोलनाला गती मिळणार नाही.
– वामन मेश्राम.
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरातील कमल गणपती हॉल शांतीनगर भुसावळ येथे २४ ऑगस्ट रोजी बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघ महाराष्ट्र राज्याचे ३९ वे राज्य अधिवेशन संपन्न झाले.
या अधिवेशनाला महाराष्ट्र भरातील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य संघटक सत्यशोधक शेतकरी सभा काॅ. किशोर ढमाले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या हस्ते राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले.
अधिवेशननाला उदबोधन करतांना वामन मेश्राम म्हणाले की ओबीसींची जातीय जनगणना घोषित करणे परंतु २०११ च्या सामाजिक आर्थिक जनगणनेची आकडेवारी घोषित न करणे हे ओबीसीचा निवडणुकीत वापर करून ब्राह्मणी सत्ता स्थापित करण्याचे बीजेपी व काँग्रेसचे षडयंत्र असल्याचा आरोप मेश्राम यांनी यावेळी केला आहे.
शेतकरी शेतमजूर कामगार रेल्वे व इतर कर्मचारी वर्गाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्यांना संविधानिक अधिकारापासून वंचित करून त्यांचे सामाजिक शारीरिक मानसिक आर्थिक शोषण करणे हे बहुजन समाजाला साधन विहीन करून दीर्घ गुलाम करण्याचे ब्राह्मणी व्यवस्थेचे षडयंत्र आहे.समस्त मूळ निवासी संघटित शक्ती निर्माण केल्यानेच अनुसूचित क्षेत्राचे आणि ५ वी व ६ वी अनुसूची क्षेत्राचे संरक्षण करणे तसेच आदिवासींचे विस्थापन थांबविणे शक्य आहे. मूळ निवासी धर्म परिवर्तित समुदायांना जैन शेख मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध लिंगायत यांच्या धार्मिक भावना भडकावून त्यांना आपआपसात लढवून धार्मिक हल्ले घडून माॅल लिंचिग करून ९० टक्के मूळनिवासी बांधवांना आपसात विभाजित करून गुलाम करण्याचे भाजपाचे एक षडयंत्र असल्याचे वामन मेश्राम यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर करून त्याद्वारे , लोक तंत्रावर अनियंत्रित नियंत्रण स्थापित करून बहुजनांना गुलाम बनविण्याचे षडयंत्र आहे . बहुजन समाजातील सर्व सामाजिक समूहाचे बुथ लेव्हलवर संघटनात्मक जाळे निर्माण केल्याशिवाय राष्ट्रव्यापी जन आंदोलनाला गती मिळणार नाही असे त्यांनी ठासून सांगितले. ईव्हीएम वर मतदानाला स्पष्ट विरोध करा यासाठी मोटार सायकलने गावोगावी फिरून एका गावात किती बुथ आहेत. तालुक्यात किती बुथ आहेत. याची सविस्तर माहिती घेऊन काम करणे आवश्यक आहे.
संघटना जर मजबूत असेल संघटनेचे जाळे सर्व दूर पसरले असेल संघटनेचा उद्देश आणि विचारधारे प्रति कार्यकर्त्यांची निष्ठा आणि गंभीरतेमुळे कठीणातले कठीण काम यशस्वीपणे पूर्ण करता येते असा सल्ला त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला आहे . कार्यक्रमात दीपक इंगळे , नवनाथ रेपे , अरविंदर सिंग खालसा , नितीन कांबळे आदी वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सूर्यकांत पाटील ऍड गुणवंत रामटेके रघुनाथ बोरकर संगीता भांबरे डॉ. तीरथ उराडे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोरखनाथ वेताळ ,डी जे नाथ , डॉ . संजय गायकवाड , सुमित्र अहिरे यांच्या सह कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
्