यावल पोलीस निरीक्षक धारबळे यांची पोलिस यंत्रणा अलर्ट.
हजारो रुपयाचा गांजा पकडला.
यावल दि.२५ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी श्री गणेशोत्सव,आगामी दुर्गोत्सव शांततेत पार पाडणे कामी,आणि उत्सव शांततेत साजरे होण्यासाठी मद्यपान, नशा करणाऱ्यांना आळा बसावा या उद्देशाने डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी आपली पोलीस व होमगार्ड यंत्रणा अलर्ट ठेवली आहे त्यांनी आज यावल चोपडा रोडवर तीन ते चार किलो गांजा पकडून अवैध धंदे करणाऱ्यांना मोठी चपराक दिली.या कामी फॉरेन्सिक अधिकारी कर्मचारी यांच्या पथकाने सुद्धा उपस्थिती देऊन पुढील कार्यवाही केली.
आज सोमवार दि.२५ रोजी यावल चोपडा रोडवर वनविभाग कार्यालयाच्या पुढे हाकेच्या अंतरावर यावलकडे येत असलेल्या दुचाकी चालकाकडे गांजा असल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ सापळारचून त्या मोटरसायकल चालकास गांजासह रंगेहाथ पकडून ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी यावल पोलीस स्टेशनला हजर केले.आणि याबाबत फॉरेन्सिक लॅब अधिकारी कर्मचारी यांचे पथक सुद्धा आपल्या वाहनांसह तात्काळ हजर झाले आणि त्यांनी कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्याची कारवाई केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.पकडलेला गांजा यावल शहरात कोणाकडे किंवा इतर ठिकाणी कोणाकडे जाणार होता.? याबाबतची चौकशी होणार आहे.
यावल शहरात पोलिसांची दिशाभूल करीत काही ठिकाणी अफू,गांजा विक्री होत असल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली असून त्यांच्यावर सुद्धा लवकरच कारवाई होणार असल्याची चर्चा आहे.