Saturday, September 6, 2025
Homeजळगावआमदार अमोल जावळे यांनी शासकीय गोदामातील धान्याची अचानक पाहणी करून चौकशी केली.

आमदार अमोल जावळे यांनी शासकीय गोदामातील धान्याची अचानक पाहणी करून चौकशी केली.

आमदार अमोल जावळे यांनी शासकीय गोदामातील धान्याची अचानक पाहणी करून चौकशी केली.

शासकीय धान्याचे नमुने आढळले नाहीत.कॉलिटी क्वांटिटीमधे आढळली तफावत.

यावल दि .२५        खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये निकृष्ट प्रतीचे तांदूळ,गहू धान्य आणि ते सुद्धा शासकीय नियमानुसार प्रत्यक्षात ग्राहकांना वितरित केले जात असल्याच्या अनेकांच्या तक्रारी असल्याने आमदार अमोल जावळे यांनी आज सोमवार दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी अचानक यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर, पुरवठा निरीक्षक चऱ्हाटे यांच्यासोबत शासकीय धान्य गोदामाची पाहणी करून आलेल्या गहू,तांदूळ धान्याचे नमुने बघितले असता धान्याचे नमुने आढळून आले नाही. तसेच धान्याच्या कॉन्टिटी आणि क्वालिटी बाबत अनेक प्रश्न उपस्थित करून यावल पुरवठा विभाग आणि जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश बिजेवार यांना भ्रमणध्वनीवरून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.

आमदार अमोल जावळे यांनी गोदामात भेट दिल्यानंतर त्यांना गोदामात गोदाम संहिता नुसार धान्य मालाची थप्पी केलेली आढळून आली असली तरी मात्र प्रत्यक्षात गहू तांदूळ बघितला असता तो गहू तांदूळ काही प्रमाणात निकृष्ट प्रतीचा आढळून आला. जिल्हास्तरावरून येणारे धान्य उचल प्रतिनिधी कोण.? धान्य उचलणारा प्रतिनिधी योग्य प्रमाणात धान्य वितरित करीत आहे किंवा नाही.? आलेल्या धान्याचे रीतसर शासकीय नमुने आढळून न आल्याने यापुढे धान्याचे नमुने राखून ठेवा अशी व इतर महत्त्वाच्या सूचना यावल पुरवठा निरीक्षक यांना देण्यात आल्या.

आमदार अमोल जावळे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश बीजेवार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून गोदामात येणाऱ्या धान्याबाबत तात्काळ सुधारणा करण्याची सूचना दिली तसेच जिल्ह्यात आणि यावल तालुक्यात शेतकऱ्यांकडून घेतलेले धान्य साठवून ठेवण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार ठिकठिकाणी धान्य गोदाम भाड्याने घेतली आहेत त्या गोदामाची लाखो रुपयाची थकबाकी अद्याप संबंधित संस्थाचालकांना का मिळत नाही..? आणि त्याबाबतची माहिती का दिली जात नाही.? याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना दिली.

 

आमदार जावळे यांनी याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे…

जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यात आणि यावल तालुक्यात अन्नदिन व अन्न सप्ताह कधी कोणत्या दिवशी साजरा केला आहे का.?
प्रत्येक तालुक्यातून दरमहा धान्याचे मागणी पत्र नियमित वेळेवर सादर केले आहे किंवा नाही..?यावल तालुक्यात अनेक रेशन दुकानदारांनी योजनानिहाय प्राप्त धान्याची माहिती वाटप व शिल्लक धान्य फलक लावलेला नाही. याबाबत कार्यवाही केव्हा होणार.
लाभार्थी धान्य घेणेस आलेनंतर त्यांनी पाणी पिणेसाठी ठेवलेले नाही. तसेच बसणेस बाके ठेवलेली नाहीत.
गोदामामधून दुकानामध्ये धान्य पोहोच झाले नंतर वाहतुक पासवर पंचाच्या सह्या घेतल्या जातात का.?
स्टॉक रजिस्टरवर कार्यालयातील संबंधिताच्या दरमहा स्वाक्षरी घेतल्या नाहीत.वारंवार सांगुनही काही लाभार्थी यांचे मोबाईल क्र.ई पॉस मशीनला अपडेट केलेले नाहीत.
धान्य उतरवुन घेतलेनंतर प्राप्त धान्याचा पंचनामा करून त्यावर पंचाच्या सह्या घेतलेल्या आहे का.?
तपासणीचे वेळी पंचनामा पुस्तक दाखविले जाते का.? वजनमापे प्रमाणपत्राची पडताळणी मुदत आणि नियमित केलेली आहे किंवा नाही.? आणि तपासणीचे वेळी नूतनीकरण केले नसलेचे आढळून आलेल्यांवर कारवाई काय केली..? लाभार्थी रेशन कार्डधारकांना सौजन्याची वागणूक दिली जाते का.? धान्य वितरण केल्यानंतर दुकानदार धान्याची पावती देत नाही असे अनेक लाभार्थी सांगतात.? धान्य दुकानदारांनी लाभार्थीस ऑनलाइन आनंदाचा शिधा १०० किट वाटप पूर्ण केले का आणि लाभार्थीचे अंगठे घेऊन किट दिलेले नाही असे सुद्धा अनेकांच्या तक्रारी आहेत. धान्य दुकानात प्रत्यक्षात शिल्लक धान्याचा पंचनामा केल्यानंतर वाटप व शिल्लक यामध्ये जी तफावत दिसून येते त्याबाबत पुरवठा अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली इत्यादी अनेक प्रश्न यावल तालुक्यात उपस्थित केले जात असून याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी,आणि तालुका पुरवठा अधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करायला पाहिजे अशा यावल तालुक्यातील लाभार्थ्यांची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या