बामणोद येथे हरतालिका पुजन संपन्न
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी बामणोद ता. यावल जि. जळगाव येथिल श्री विठ्ठल मंदिरात महिलांकडून हरतालिका पुजन भक्तिभावाने व आनंदात संपन्न झाले पुजेचे पौरोहित्य कीरण जोशी महाराज यांनी केले
हिंदू धर्मातिल महिला व कुमारीकांसाठी हे एक व्रत सांगितलेले आहे . महाराष्ट्रात हरतालिका तिजला हरतालिका भाद्रपद तृतिया असे संबोधले जाते हे पुजन व व्रत उत्तर भारता प्रमाणेच करण्यात येते विवाहित महिला त्यांच्या पतिच्या कल्याणासाठी ,आरोग्यासाठी, दिर्घायुष्य मिळावे यासाठी व आनंदी व उत्तम वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात तर अविवाहित मुली चांगला पति मिळावा म्हणून हे व्रत व उपवास करतात .
हरीता म्हणजे जीला नेले ती आणि लिका म्हणजे सखी पार्वतिला शिव प्राप्ति व्हावी म्हणून सखी तपच्शर्या व पुजनासाठि घेऊन गेले म्हणून पार्वतिला हरतालिका असे सुद्धा म्हणण्यात येते हिदू धर्मात शिव पार्वती किंवा
ऊमामहेश्वर ही जगताची मातापिता म्हणून ओळखले जातात स्त्री तत्व व पुरुष तत्व यांच्या मिलनातुनच विश्वाची निर्मिती झाली म्हणून या तत्वाचे पुजन करण्यात येते .
आदिशक्तिच्या पुजनातून आपल्याला तिचे प्रागटिकरण मिळावे म्हणून ही पुजन उपवास केला जातो . या पुजना साठी बेलपत्र व विविध प्रकारचे फळे , व पाने घेतली जातात .