श्री गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी यावलचा विकसित भाग अंधारात.
अधिकाऱ्यांची निष्क्रियता आणि बेजबाबदारपणा उघड.
यावल दि.२७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आज बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 हा गणेशोत्सवाचा पहिला दिवस परंतु यावल शहराचा विकसित भाग आज संध्याकाळपासून तीन तास अंधारात असल्याने यावल शहराचा भुसावळ रोडला लागून असलेला संपूर्ण विकसित भाग संध्याकाळी सात वाजेपासून ( रात्री सात ते दहा वाजेपर्यंत बातमी पाठवीत आहे तोपर्यंत ) अंधारात असल्याने, आणि वीज पुरवठा किंवा पूर्ववत होईल निश्चित नसल्याने संबंधित सर्व शासकीय यंत्रणेचे नियोजन आहे किंवा नाही याबाबत यावल शहरात नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केला जात आहे.