Friday, May 1, 2026
Homeगुन्हाजबरी चोरीच्या गुन्हयातील फरार आरोपी बाबा काल्या यास अटक

जबरी चोरीच्या गुन्हयातील फरार आरोपी बाबा काल्या यास अटक

जबरी चोरीच्या गुन्हयातील फरार आरोपी बाबा काल्या यास अटक

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस गुरनं. २८८/२०२५ भा. न्या. संहिता क. ७४,३०९(४),११५(२), ३५२,३५१ (२) (३),३(५) प्रमाणे ७ मे रोजी दाखल होता. सदर गुन्हा दाखल झाल्यापासुन यातील आरोपी आशिक बेग असलम बेग ऊर्फ बाबा काल्या रा. खडका रोड, भुसावळ हा फरार होता.
पोलीस अधीक्षक स डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने नमुद आरोपी याचा शोध घेवुन त्यास तात्काळ अटक करणे स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना आदेश दिले होते .
त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक, संदीप पाटील यांनी पोउपनि, शरद बागल व त्यांचे पोउपनि, रवी नरवाडे यांचे पथक फरार आरोपी याचा शोध घेवुन त्यास अटक करण्यासाठी तयार केले होते
दि.२७ ऑगस्ट रोजी नमुद पथक हे फरार आरोपी याचा शोध घेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे श्रे. पोउपनि, रवि नरवाडे व त्यांचे पथकातील अंमलदार यांना गोपनिय माहिती व्दारा आरोपी आशिक बेग असलम बेग ऊर्फ बाबा काल्या रा. खडका रोड, भुसावळ फैजपुर येथील हॉटेल हॉटस्पॉट येथे आला असल्याची बातमी मिळाल्याने सदर पथकाने हॉटेल हॉटस्पॉट, फैजपुर येथे जावुन फैजपुर पो.स्टे, यांचे मदतीने नमुद आरोपी यास ताब्यात घेवुन पुढील तपासकामी पो.स्टे. भुसावळ बाजारपेठ यांचे ताब्यात दिले आहे .
पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन स्टाफ करीत आहेत.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक सो., जळगांव, डॉ महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री संदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि, शरद बागल श्रे. पोउपनि, रवि नरवाडे, पोहेकों/गोपाळ गव्हाळे, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोकों/विकास सातदिवे, पोकों/प्रशांत परदेशी, पोको राहुल वानखेडे स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव तसेच फैजपुर पोस्टे. चे सपोनि रामेश्वर मोताळे, पोउपनि, मैनुद्दीन सैय्यद, पोकों जुबेर शेख आदींनी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या