पूर्व सूचना न देता यावल शहरात व्यवसायिकांचा आणि घरगुती वापराचा वीज पुरवठा खंडित केल्याने जातीय सलोखा धोक्यात.
श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी हजारो नागरिकांच्या घरात अंधार.
यावल दि.२८ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वीज वितरण कंपनी,यावल नगरपरिषदेने यावल शहरातील नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता बुधवार दि. २७ रोजी श्री गणेश स्थापनेच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी ७ वाजेपासून तर रात्री १२ वाजेपर्यंत आणि आज गुरुवार दि.२८ रोजी सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत यावल शहरातील व्यवसायिकांचा / दुकानदारांचा तसेच घरगुती वापरासाठी वीजपुरवठा घेतलेल्या इलेक्ट्रिक तार / वायर कट करून वीज पुरवठा खंडित केल्याने ९० % यावल शहर अंधारात राहिल्याने सर्व समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून अनेकांच्या घरात श्री गणेशाची पूजा विधी करण्यासाठी अडथळा निर्माण झाल्याने संपूर्ण यावल शहराचा जातीय सलोखा, कायदा सुव्यवस्था, शांतता धोक्यात आल्याने यावल नगरपरिषद आणि वीज वितरण कंपनीच्या भोंगळ व नियोजन शून्य कामकाज करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यां विरुद्ध यावल पोलीस काय कारवाई करणार..? आणि कारवाई होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधी काही हस्तक्षेप करणार का..? याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
याबाबत सविस्तर अशी माहिती की गणेशोत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण यावल शहरातील गणेश मंडळाच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीसाठी यावल नगरपरिषदेने आपल्या यंत्रणेमार्फत काय काय नियोजन केले,तसेच विविध कार्यक्रम घेणाऱ्यांना यावल नगरपरिषद कोणत्या अटी,शर्तीनुसार, नियमानुसार परवानगी देत असते त्यानंतर वीज वितरण कंपनी यावल शहरात वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी काय नियोजन करते इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने तसेच संबंधित अधिकारी,कर्मचारी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करून बेजबाबदारपणा,हलगर्जीहीपणा केल्याने संपूर्ण यावल शहरातील जातीय सलोखा कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याने पोलीस आता यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारीनुसार काय कारवाई करणार याकडे संपूर्ण यावल करांचे लक्ष वेधून आहे.
यावल नगरपरिषद,वीज वितरण कंपनी यांच्या निष्क्रियतेमुळे यावल पोलिसांच्या दैनंदिन कामकाजावर तसेच सर्व जाती धर्माचे विविध धार्मिक सण,उत्सव साजरे करताना यावल शहराला वेठीस धरणाऱ्या विरुद्ध आणि पोलीस यंत्रणेला बदनाम करून त्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या विरुद्ध यावल पोलिसांना कारवाई करू नये म्हणून काही राजकारणी हस्तक्षेप करून आपला प्रभाव पोलिसांवर टाकणार का..? तसेच श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी सुद्धा यावल शहरातील वीजपुरवठा खंडित होणार आहे का.?याकडे आता यावलकरांचे लक्ष लागून आहे.