गणेशोत्सवानिमित्त महात्मा गांधी विद्यालयात विविध स्पर्धांचे उत्साही आयोजन
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता भुसावळ दि २८ :
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,वरणगाव येथे गणेशोत्सवा निमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात लिंबू चमचा,संगीत खुर्ची,स्लो सायकल शर्यत,रांगोळी अशा विविध स्पर्धांचा समावेश होता.विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत आपल्या कला व कौशल्याचे प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.जे.तायडे यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी पर्यवेक्षक डी.आर.कोळंबे,गोपाळ पाटील, वाय.आर.पाटील,तसेच क्रीडाशिक्षक लक्ष्मीकांत नेमाडे उपस्थित होते.
स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धांचे परीक्षण उज्वला सूर्यवंशी,सविता लांडे आणि राजश्री सपकाळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.