Saturday, September 6, 2025
Homeजळगावबामणोद येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिर संपन्न

बामणोद येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिर संपन्न

बामणोद येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिर संपन्न

फैजपुर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          बामणोद ता.यावल जि.जळगाव येथे भारत सरकारचे प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत गोल्डन कार्ड शिबिर घेण्यात आले .
पाडळसा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत उपकेंद्र आयुष्यमान आरोग्य मंदिर बामणोद येथे दिनांक 28 आगस्ट रोजी प्रधानमंत्री आरोग्य विमायोजना अंतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिर घेण्यात आले आहे .

 


या योजनेमधे लाभार्थ्यांना पाच लाख रुपये पर्यंत मोफत वैद्यकिय उपचार मिळतात
या शिबिरासाठी पाडळसा प्राथमिक आरोग्य केंद्रचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अशफाक अहेमद शेख आरोग्य सेवक नितीन पाटील व आरोग्य सेविका पुजा नेवे व आशा वर्कर रेखा झांबरे , विमल कोळी , जयश्री सोनवणे , निर्मला भंगाळे , प्रतिभा बोंडे , रंजना वारके , व सुनिता इंगळे यांनी परीश्रम घेतले .
होतकरू गरीब नागरीकांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . शेकडो ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या