Saturday, September 6, 2025
Homeजळगावबालमोहन मराठी शाळा पिंप्राळा येथे रीमझीम पाउस गाणी कार्यक्रम संपन्न

बालमोहन मराठी शाळा पिंप्राळा येथे रीमझीम पाउस गाणी कार्यक्रम संपन्न

बालमोहन मराठी शाळा पिंप्राळा येथे रीमझीम पाउस गाणी कार्यक्रम संपन्न
बामणोद   आर.के.इंगळे) खानदेश लाईव्ह न्युज              कै. गिरीजाबाई नथ्थुशेट चांदसरकर बालमोहन मराठी प्राथमिक शाळा पिंप्राळा येथे रीमझीम पाउस गाणी हा कार्यक्रम संपन्न झाला
या कार्यक्रमाला प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिक सौ. मनिषा कानडे मॅडम व जेष्ठ शिक्षिका सौ. वंदना भिरुड मॅडम ह्या उपस्थित होत्या या कार्यक्रमाला पहिली ते चौथीच्या विद्यार्थांनी विवीध पाऊस गाणी सादर केली तिसरी व चौथीच्या विद्यार्थांनी नाच रे मोरा या गाण्यावर सुंदर असे नृत्य सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली व सर्व विद्यार्थ्यांनी धम्माल केली शाळेच्या

 

मुख्याध्यापिका यांनी पावसाची माहिती व मानवास जरूरी बद्दल सांगितले गणेत्सवानिमित्त प्रसाद म्हणून वाटण्यात येणारे मोदक बनवायची स्पर्धा घेण्यात आली सहभागी विद्यार्थांना बक्षीस म्हणून पेन्सिल वाटप करण्यात आले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला . निसर्ग व अध्यात्माचा संगम असलेला हा कार्यक्रम विशेष रंगतदार झाला .
या कार्यक्रमाला सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या