फैजपूर येथील नारखेडे परिवाराचा जर्मनी देशात गणेशोत्सव

फैजपूर । खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा सहकार भारती जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांचे थोरले सुपुत्र विक्रांत नारखेडे हे सध्या जर्मनीत वास्तव्यास आहे. त्याठिकाणी त्यांनी भारतीय संस्कृती व परंपरे नुसार गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. श्री गणेशाची विधिवत स्थापना करून जर्मनीत वास्तव्यास असणारे सर्व मराठी बांधवांना एकत्रित करून उत्सव साजरा करून आनंद घेण्यात येत आहे. दररोज आरती, अथर्वशीर्ष पठन आदी प्रार्थना करून येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसाद भंडारा आदी कार्यक्रम सुरू आहे. त्याठिकाणी पुण्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक शनिवार वाड्याची प्रतिकृतीचा देखावा तयार केला आहे. त्यांना सौ. प्रज्ञा विक्रांत नारखेडे व जर्मनीतील सर्व मराठी बांधव एकत्रितपणे सहकार्य करीत आहे. भारतीय सण व उत्सव मोठ्या भक्तीभावाने नियमित साजरे केले जात असल्याने मराठी बांधवांमध्ये भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरण असते.

